डिप्रेशन/नैराश्य एक सायलेंट किलर (मराठी)
डिप्रेशन किंवा नैराश्य हा एक गंभीर मानसिक आजार आहे। भारतात दर 4 मागे 1 व्यक्ती या आजाराच्या लक्षणांनी पिडित आहे (संदर्भ: who संकेतस्थळ)
डिप्रेशन नी पीडित व्यक्ती बहुतांश वेळा चिडचिडेपणा, झोपेच्या समस्या, थकवा, विसारभोळेपणा, सतत राहणाऱ्या पाचन समस्या इत्यादींनी ग्रस्त होते। त्यामुळे अशा व्यक्तीचा प्रथम संपर्क हा फॅमिली डॉक्टर, जनरल फिजिशियन डॉक्टर यांच्याशी होतो।
जर आपल्याला डिप्रेशन विकाराची वरील पैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील किंवा वारंवार डॉक्टर कडे जाऊन, वेगवेगळ्या तपासण्या करून सुद्धा समाधानकारक रोगनिदान होत नसेल, तर आपल्या डॉक्टर ला जरूर हे विचारा'मला मानसोपचार तज्ञा कडे जायची गरज आहे का? तुम्ही मला मानसिक आरोग्य समस्येची औषधे स्वतः देत आहात का'
जागृती ही रोगमुक्त होण्याची पहिली पायरी आहे!
तुमचा हक्क, तुमचा मानसोपचार तज्ञ!
जनहितार्थ: डॉ श्रेयस श्रीकांत पेंढारकर